संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी 20 नोव्हेंबरला होणाऱ्या कामठी विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा निपक्षपातपणे अधिकार बजवावा यासाठी कामठी पंचायत समितीच्या वतीने बाईक रॅलीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. कामठी पंचायत समिती कार्यालयासमोरून कामठी विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे ,कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले ,गटशिक्षण अधिकारी संगीता तभाने यांचे हस्ते हिरवा ध्वज दाखवून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली बाईक रॅली कामठी रेल्वे स्टेशन ,मोटर स्टॅन्ड चौक ,उपजिल्हा रुग्णालय, खलाशी लाईन, संजय नगर ,कमसरी बाजार ,यादव बगीचा ,नया नगर, चंद्रमणी नगर, तहसील कार्यालय ,नगरपरिषद कार्यालय ,जयस्तंभ चौक, पोलीस लाईन ,नया गोदाम, कामठी कंटोनमेंट बोर्ड ऑफिस, गरुड चौक, पोस्ट ऑफिस ,माल रोड, महादेव घाट, स्कूल ऑफ सायन्स ,सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल चौक, गोरा बजार, पुराना गोदाम विविध मागा मार्गाने नगर भ्रमण करीत पंचायत समिती कार्यालयात मतदान जनजागृती रॅलीचे समापन करण्यात आले कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले गटशिक्षण अधिकारी संगीता तभाने यांनी ठिकठिकाणी नागरिकांची संवाद करून प्रत्येक नागरिकांनी आगामी विधानसभा निवडणुकी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, भयभीत न होता मतदानाचा हक्क बजावण्याचे आव्हान केले बाईक रॅलीमध्ये कामठी पंचायत समितीचे अधिकारी ,कर्मचारी, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.