‘पौर्णिमा दिवस’ निमित्त रामदासपेठ परिसरात जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत बुधवारी (ता.२२) रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंग चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

या अभियानाला रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंग चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

याप्रसंगी ग्रीन व्हिजीलचे सर्वश्री कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, पार्थ जुमडे, मनपाचे राजेंद्र राठोड, गजेंद्र तारापूरे, सुनील नवघरे, सचिन फाटे यांच्यासह भोलानाथ सहारे, अरविंद भंसाली, रुची आनंद, विस्मय फुले आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस

Sat May 25 , 2024
– तंबाखू नियंत्रण काळाची गरज यवतमाळ :- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या जनजागृतीसाठी दि. ३१ मे हा दिवस दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाकरीता जागतिक आरोग्य संघटनेने “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण” हे घोषवाक्य निवडले आहे. तंबाखू नियंत्रण समुदायाच्या प्रयत्नांमुळे सिगारेटचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले असले तरी २०२२ च्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!