पौर्णिमा दिवसा’निमित्त प्रतापनगर चौक परिसरात जनजागृती

एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार व शहराचे माजी महापौर अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून पौर्णिमा दिवस अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी प्रतापनगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.

वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शक माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी यावेळी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. ग्रीन व्हिजिल चे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, तुषार देशमुख, प्रिया यादव, दीपक प्रसाद, काजल पिल्ले आदी स्वयंसेवकांनी जनजागृती केली.

जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

यावेळी मनपाचे राजेंद्र राठोड, विप्लव भगत यांच्यासह भोलानाथ सहारे, अनिल झोडे, अशोक सायरे, अनुपमा सायरे, किशोर भागडे, मधुकर पाठक, किशोर दळवी, गुरमीतसिंग बावरी, माया हाडे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

VSPM MDINE conducted the National Conference on Pathways Transforming Nursing Future

Wed Feb 8 , 2023
Dr. Vedprakash Mishra appreciated the efforts made by VSPM MDINE Dr. Ayushree Ashish Deshmukh assured all types of help.  Nagpur :- The two days National Conference on ‘Pathways Transforming Nursing Future’ by VSPM Madhuribai Deshmukh Institute of Nursing Education (VSPM MDINE) on 30th & 31st January 2023 at Digdoh Hills, Hingna Road, Nagpur. Dr. Vedprakash Mishra, Pro-chancellor & Advisor of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com