‘पौर्णिमा दिवस’ निमित्त बजाज नगर चौकात जनजागृती

– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (ता.२८) बजाज नगर चौक परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी महापौरपदी असताना पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात केली होती.

मंगळवारी जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवित जनजागृती कार्य केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

याप्रसंगी मनपाचे सर्वश्री. राजेंद्र राठोड, विप्लव भगत, सुब्रत दलाल यांच्यासह ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, प्रिया यादव, श्रीया जोगे, दीपक प्रसाद, तुषार देशमुख आदींनी जनजागृती केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शांती नगर ESR, बोरियापुरा ESR, बस्तरवाडी-1A ESR, बोरियापुरा-2 ESR मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत

Fri Dec 1 , 2023
#बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही… नागपूर :- स्वच्छ आणि सुरक्षित पाणी वितरण सुनिश्चित करण्यासाठी, OCW आणि NMC ने शांती नगर ESR, बोरियापुरा ESR, बस्तरवाडी-1 -1A ESR, बोरियापुरा -2 ESR ची अनुसूचित स्वच्छता जाहीर केली. साफसफाईची कामे खालील तारखांना होणार आहेतः (A) शनिवार, 2 डिसेंबर 2023: शांती नगर ESR (B) मंगळवार, 5 डिसेंबर 2023: बोरियाप्रा ESR (C) गुरुवार, 7 डिसेंबर 2023: […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com