धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवा निमित्त शाळेला भेट वस्तु प्रदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्ष पुर्ती निमित्त रौप्य महोत्सव सुरू आहे. आज शनिवार (दि. २८) ला या रौप्य महोत्सवा निमित्त भाजप भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ रोहित माडेवार यांनी धर्मराज प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या प्रगती बद्दल चौकशी करून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन रौप्य महोत्सवा निमित्त धर्मराज प्राथमिक शाळे ला ६ खुर्ची व २ टेबल भेट वस्तु म्हणुन प्रदान करण्या त आल्या. लवकरच विद्यार्थ्यांसाठी क्रिडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या नागपुर जिल्हाध्यक्ष  सिमा कश्यप उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुजरात येथुन भटकलेल्या अनोळखी इसमाच्या नातेवाईकाशी संपर्क करून दिला

Sat May 28 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर हयानी दिला माणुसकीचा परिचय. कन्हान : – गुजरात येथुन तीन महिन्या पुर्वी घरून निघालेला एक अनोळखी इसम आढळुन आल्याने दणका युवा संघटनाचे योगेश वाडीभस्मे व किरण ठाकुर यांनी पुढाकार घेत त्याच्या नातेवाईकांशी फोन वर संपर्क करून तो गिरीश चंदु नावाचा इसम गुजरात चा असल्याचे कळल्याने त्याचे नातेवाईक घ्यायला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com