तृतीयपंथीयांना ओळखपत्रासह घरकुल योजनेचा लाभ द्या – विजयलक्ष्मी बिदरी

Ø तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची बैठक

Ø तृतीयपंथांना ओळखपत्र, आधारकार्डसाठी शिबीरांचे आयोजन

Ø विभागात 289 तृतीयपंथीयांची नोंदणी

नागपूर :- तृतीयपंथीयांच्या संरक्षणासोबतच ओळखपत्र, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र तसेच घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हानिहाय विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची बैठक बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर आयुक्त प्रदीप देशमुख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, विधी व न्याय विभागाचे सुवर्णा खंडेलवाल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल बन्सोड, सारथी ट्रस्टच्या आचल वर्मा, विद्या कांबळे, तनुश्री आदी बैठकीत उपस्थित होते.

तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळातर्फे विभागातील तृतीयपंथीयांची नोंदणी राष्ट्रीय पोर्टलवर करण्यात येत असून विभागात 289 तृतीयपंथीयांची नोंदणी झाली असून यापैकी 235 व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विभागातील तृतीयपंथीयांचे सर्वेक्षणानुसार आधार कार्ड, राशन कार्ड व मतदान ओळखपत्र देण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना करतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, ज्या व्यक्तींना घराची आवश्यकता आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत.

तृतीयपंथीयांमध्ये असलेल्या विविध कौशल्यासोबतच रोजगारक्षम कौशल्य विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करावे तसेच त्यांना मागणीनुसार पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. यासाठी विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावा. तृतीयपंथीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी सादर केलेल्या सुचनांनुसार जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विशेष बैठक आयोजित करावी.

कल्याण मंडळातर्फे विविध योजनांच्या लाभ देण्यात येत असून विभागातील 219 तृतीयपंथीयांना आधार कार्ड, मतदान कार्ड व राशन कार्ड देण्यात आले आहे. तसेच 217 पोर्टलद्वारे ओळखपत्र तर 221 लाभार्थ्यांचे विकास तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 165, चंद्रपूर 33, गोंदिया 12 तर वर्धा, भंडार व गडचिरोली प्रत्येकी 4 तृतीयपंथी लाभार्थ्यांचा समावेश आहे.

प्रारंभी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर विभागातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपूर पर्पल उत्सवाचे आयोजन

Fri Jan 24 , 2025
– दिव्यांग बांधवांकरीता कला व सांस्कृतीक कार्यक्रम चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी चंद्रपूर पर्पल उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यात विविध कला व सांस्कृतीक कार्यक्रम प्रस्तुत केले जाणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या दिव्यांग धोरण अंतर्गत दिव्यांग कौशल विकास मल्टीपर्पज सोसायटी व पुनम प्रॉडक्शन यांच्या साहाय्याने दिव्यांग बांधवांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी गणतंत्र दिनानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी प्रियदर्शिनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!