मुंबई :- नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 4407 कर्मचारी ऐवजदार या पदावर कार्यरत आहेत.
शासनाने दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी या बाबतीत एक परिपत्रक प्रसिद्ध केले. या शासन निर्णयात ज्या ऐवजदारांना 20 वर्ष झाले असेल अशा एवजदारांना परमनंट करावे असा निर्णय प्राप्त आहे .
नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेत अंदाजे 60 ते 70 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी 20 वर्ष पेक्षा जास्त कालावधीपासून एवजदार पदावर कार्यरत आहेत.
यांच्यामुळेच सन 2000 ते सन 2012 पर्यंत नागपूर महानगरपालिका राज्यात साफसफाई मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत आली आहे.
सन 2019 चा शासन निर्णय हा ऐवजदारांना परमनंट करण्याबाबतचा करण्याबाबत झाला परंतु ऐवजदारांनी जी सेवा दिली आहे त्यांच्या वारसांना मात्र लाड कमिटीचा कोणताही लाभ देण्याचा मुद्दा या शासन निर्णयात नाही .त्यामुळे,
1. लाड कमिटीच्या मार्फत या एवजदारांना आवश्यक लाभ देण्यात यावेत
2. ऐवजदारांना वारसा पद्धती लागू करण्यात यावी .
3. ऐवजदार हे पद कोणत्याही परिस्थितीत व्यपगत करण्यात येऊ नये आणि जे एवजदार ऐवजदार या पदावर कार्यरत असताना मरण पावले त्यांच्या वारसांना ऐवजदार कार्ड देणे देण्यात यावे.
अशा मागण्या दटके यांनी लक्षवेधी च्या माध्यमातून केल्या.
याला उत्तर देताना याच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्या नेतृत्वात बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.