आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त म.न.पा. व्दारा विनम्र अभिवादन

नागपूरता. ३ : अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य  शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी, मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, वार्डाच्या नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका श्रीमती लता काटगाये, माजी उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, माजी नगरसेविका निता ठाकरे, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

          या प्रसंगी सर्वश्री.सुभाष घाटे, राजेश हातीबेड, श्रीमती प्रेरणा कदम, रेखा घनतुळावर आदी उपस्थित होते.

          तसेच म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील स्थायी समिती सभा कक्षात महापौर दयाशंकर तिवारी, अति.आयुक्त दिपक कुमार मीना, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, उपायुक्त श्री. रविन्द्र भेलावे, निगम अधीक्षक श्री. पांडुरंग शिंदे, श्री. मदन सुभेदार विशेष कार्यसन अधिकारी, सहा. अधिक्षक राजकुमार मेश्राम  यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नागपूरसाठीही ‘तो’ निर्णय अंमलात यावा : महापौर

Mon Jan 3 , 2022
नागपूर, ता. ३ : मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या  घोषणेचे नागपूरचे महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी स्वागत केले आहे. मात्र, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठीही हा निर्णय लागू झाला असता तर आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.           यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, या निर्णयातून नागपूरच्या जनतेवर अन्याय झाला आहे. ते सुद्धा या राज्याचे नागरिक आहेत. त्यांना सुद्धा याचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. मुंबईची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे; पण नागपूरसोबत अन्य महानगरपालिकांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com