रक्षक बनले भक्षक

नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शाहर पश्चिम विभाग उपाध्यक्ष अभिषेक डे व उत्तर विभाग उपाध्यक्ष मोहित देसाई यांना अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बॅरेल पब बाबत काही नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे त्याची शाहनिशा करण्याकरिता अभिषेक डे व त्यांचे सहकारी मोहित हे दोघे दिनांक 3/9/23 ला रात्री एक ते दिड वाजताच्या दरम्यान पब मध्ये गेले व रीतसर त्यांची 4000 रुपये प्रवेश शुल्क भरून त्यांनी आत प्रवेश केला. तेथील हालचालींवर दोघेही जण लक्ष ठेवून होते त्यामुळे तेथील स्टाफला यांच्यावर संशय आला व त्यांनी पोलिसांसोबत संगणमत करून त्यांचे विरुद्ध कट रचला अभिषेक डे हे वॉशरूम मध्ये गेले असताना मोहितला एकटे बघून भांडणाला सुरुवात केली.

भांडण सुरू झाल्याबरोबर तेथे पोलीसही पोहोचले पोलीस मोहितला पकडून नेत असताना अभिषेक डे हा वॉशरूम मधून बाहेर आला अभिषेक डे याने पोलिसांना आपला परिचय दिला व आपण या या कामाने येथे आलेलो आहे. याची माहिती दिली असता, पोलिसांनी त्याचे काही न ऐकता त्यांनाच शिवीगाळ करीत दोघांनाही गाडी बसवून पोलीस स्टेशनला आणले पोलीस स्टेशनला आणल्यावर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी असल्याचा कुठलाही भान न राखता दोघांनाही बेदम व अमानुषपणे मारहाण करत होते आणि मनसे पक्षाला, त्यांच्या परिवाराला अभद्र शिवी देत होते त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेसाठी 20,000 रुपयांची मागणी केली.

वीस हजार रुपये अभिषेक डे यांच्या पत्नीने पोलिसांना सकाळी 5:00 वाजताच्या सुमारास आणून दिल्यानंतर त्यांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर अभिषेक डे यांनी ही सगळी बाब सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहराध्यक्ष चंदू  लाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. सकाळी शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, तसेच काही कार्यकर्ते अंबाझरी पोलीस स्टेशनला आले त्यांना जाब विचारल्यास उडवा उडीचे उत्तर दिले व कुठलीही कारवाई न करता फक्त तुम्ही आम्हाला एक अर्ज लिहून द्या असे सांगितले. व तुम्ही पोलीस आयुक्त साहेबाकडे याची दाद मांगा. यावेळी ही घटना घडली त्यावेळी पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे हे उपस्थित होते व हा सर्व प्रकार त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. या प्रकरणात कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही किंवा अभिषेक डे व मोहित देसाई बद्दल कुठलीही FIR दाखल न करता त्याला अमानुष अमानवीय थर्ड डिग्री प्रमाणे त्याला मारहाण केली, मारहाण इतकी जबरदस्त आहे की, हे दोघेही डिस्ट्रब झालेले आहेत व त्याची मानसिक स्थिती ढासळून गेलेली आहे. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत. एवढी अमानवीय मारहाण करुण पोलीस इथेच थांबले नाही तर त्यांच्याकडून वीस हजाराची लाच घेऊन त्यांना सोडण्यात आले. या दोघांच्या पत्नीने सकाळी पाच वाजता पोलिसांना २०,०००/- दिल्या नंतर त्यांना सोडन्यात आले.

अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही करण्यात आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध व त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन दोषींना तात्काळ निलंबित करण्यात यावे.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहराध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे, उपशहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे, शहर सचिव श्याम पुनियानी, विभाग अध्यक्ष चेतन बोरकुटे, अंकित झाडे, उमेश उतखेडे, महिला विभाग अध्यक्षा रचना गजभिये विभाग संघटक चेतन शिराळकर विभाग सचिव साहिल बेहरे, विभाग उपाध्यक्ष विनीत तांबेकर, हर्षद दसरे महिला विभाग उपाध्यक्षा प्रिया बोरकुटे शाखाध्यक्ष राहुल दंभाळे व इतर मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते.

परिमंडल क्रमांक दोन च्या सहाय्यक उपायुक्त पाटील यांनी दोन दिवसात या प्रकरणा संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चुनाभट्टी आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण

Tue Sep 5 , 2023
मीनागपूर :- नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सोमवारी (ता. ४) लक्ष्मीनगर झाोन अंतर्गत चुनाभट्टी, जुनी अजनी, अंबिका नगर, आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनी फित कापून आरोग्यवर्धिनी केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, माजी नगरसेविका लक्ष्मी यादव, मिनाक्षी तेलगोटे, माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com