नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) उपकेंद्र नागपूर व्दारा ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम बार्टी उपकेंद्रात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्याने प्रा. डॉ. संगिता टेकाडे एकमेव महिला कलाकार यांनी अत्यंत जिवंत प्रतिमा उभारून “मी सावित्रीबाई बोलतेयं ” हा एकपात्री प्रयोग सादर केला.
सावीत्रीबाई फुले यांनी स्वत: शिक्षण शिकूण इतरांना सुशिक्षीत करण्यासाठी जे कष्ट घेतली, जे हाल त्यांना सोसावे लागले. हे सर्वांनी पुस्तकांच्या माध्यमातून आपण वाचलेच. पण जेव्हा त्यांची कलाकृती प्रत्येक्षात साकारुन आपल्यासमोर सादर करण्यात आली. कलाकृती प्रत्यक्षात उभाऊन आपल्या समोरसादर करतात तेव्हा तो कलावंत एक कलावंत नसून प्रत्यक्षात सावीत्रीबाई “समक्ष उभ्या असल्याचा भास होत होता. म्हणजे समक्ष प्रत्येक्षात सावीत्रीबाई फुलेंना पाहत असल्याचे समाधान सहा. प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेसनी तेलगोटे अध्यक्षा व आशा कवाडे संशोधन अधिकारी यावेळी उपस्थित होत्या.