संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जतीन अॅग्रो फूड प्रा. लि कंपनीने कामठी तालुक्यातील 150 कामगारांना विनासूचना कामावरून कमी केल्यामुळे मागील 12 फेब्रुवारी पासून सर्व कामगार उन्हामध्ये दिवसभर कंपनीबाहेर बसून असतांनाही त्यांना न्याय न-मिळाल्याने सर्व कामगारांनी प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या कडे तक्रार करून न्याय मिळवून द्यावे अशी मागणी केली.
प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी क्षनाचाही विलंब न-करता कामगारांच्या मागण्यासह. कामगार आयुक्त नागपूर विभाग यांच्या कडे बैठक घेतली परंतु तरीसुद्धा समस्याचा तोडगा निघाला नाही. शेवटी संतापुण समग्र कामगारांनी माजी मंत्री सुनिल केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. अवंतिका लेकुरवाळे सभापती म.बा.क. जिल्हा परिषद नागपूर यांच्या नेतृत्वात आज दि. ०५/०३/२०२४ रोजी जतीन अॅग्रो फूड प्रा. लि कंपनी मालकाच्या विरोधात ग्रामपंचायत चौक वडोदा ते कंपनी पर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. तथप्रसंगी कंपनी मालकाने आपली चूक मान्य करून १५० कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे आश्वासन दिले.
प्रसंगी मुक्ता कोकड्डे अध्यक्ष जि.प. नागपूर, कु. कुंदा राउत उपाध्यक्ष जि.प. नागपूर, दिलीप वंजारी उपसभापती पं.स. कामठी, आशिष मल्लेवार माजी उपसभापती, अनंता वाघ कामठी तालुका अध्यक्ष कॉं.क., सोनु कुथे सदस्य पं.स. कामठी, ग्रा.पं. सदस्य पंकज ढोरे, अतुल बाळबुधे सरपंच, सुधाकर ठवकर, अमोल भिवगडे, मंगलमुर्ती थोटे, राकेश लाकडे, छाया हलमारे, अर्चना गाडबैल, ताराबाई भोयर, सुनील भुजबळ, महेश अटारकर, विनोद ठाकरे, वंदना सहारे, नलिनी तलंजे, अर्जुन राउत, सचिन भोयर, पुरुषोत्तम वाघाये, नसीर शेख, गौरव भोयर, स्वप्नील राउत, विशाल गाडबैल, नंदकिशोर खेटमले माजी सरपंच, गुड्डू खराबे, विक्की मते, आदीसह समग्र कामगार उपस्थित होते.
प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व कामगारांनी आभार व्यक्त केले. तसेच सदर मोर्चाला ग्रा.पं. सदस्य पंकज ढोरे विशेष योगदान व आयोजन केले.