नागपूर :– नागपूर महानगरपालिका नेहरू नगर झोन कार्यालयाच्या मनपा वसुली पथकाद्वारे थकबाकी मालमत्ता कर धारकांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील थकीत मालमता कर वसुली संदर्भात जनजागृती व कार्यवाही केली जात आहे. त्यानुसार, नेहरूनगर झोन कार्यालयाद्वारे मालमत्ता क्र:1288/254 प्रल्हाद बाबूराव पडोळे यांच्या मालकीच्या जगनाडे चौक येथील मालमत्तेवर कार्यवाही करण्यात आली.
नेहरू नगर झोनचे सहायक अधीक्षक गजेंद्र ठाकूर, कर निरीक्षक सचिन मेश्राम, संजय कापगते, किसन बारई यांच्या पथकाने प्रल्हाद बाबूराव पडोळे यांच्या या मालमत्तेवर वर्ष २००१ पासून १७ लक्ष ६८ हजार रुपये व त्यावर शास्ती २४ लक्ष १४ हजार रुपये असे एकूण ४१ लक्ष ८२ हजार रुपये थकीत असल्याचे सांगून त्यांना मनपाद्वारे सुरू असलेल्या अभय योजना २०२३-२४ बाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांना ४१ लक्ष ८२ हजार रुपये एवजी २२ लक्ष ५१ हजार रुपये भरणा करण्याबाबत सांगितले. मिळकतदार यांनी या अगोदर थकीत मालमत्ता कर बाबत आक्षेप सादर केलेले असून, त्यांचे आक्षेपचे निराकरण या अगोदरच करण्यात आलेले होते. तरी देखील मिळकतदार थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता वारंवार टाळाटाळ करीत असल्याने मिळकतीवर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.