– लकी ड्रॉ द्वारे १० विद्यार्थ्यांची निवड
– स्पर्धेत ७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित एक पौधा एक विद्यार्थी २०२४ स्पर्धेत चिल्ड्रेन्स अकॅडेमी इंग्लिश मिडीयम शाळेच्या १० विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले. मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला.
शहराच्या हरितीकरणास संजीवनी, जैवविविधतेला प्रोत्साहन मिळावे याकरीता वृक्ष लागवड व जतन करणे या उद्देशाने एक पौधा एक विद्यार्थी २०२४ या स्पर्धेचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले होते. यात शहरातील शासकीय व खाजगी शाळा मिळुन एकुण ७४ शाळांनी सहभाग नोंदविला होता. नोंदणी धारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वृक्ष देण्यात येऊन वृक्ष आपल्या घरी व आपल्या परिसरात लावून त्याची लागवड व संगोपन करुन १ वर्ष देखभाल करण्यास सांगण्यात आले होते. स्पर्धेचे मुल्यमापन दर महिन्यात करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४१४ झाडे लावणाऱ्या चिल्ड्रेन्स अकॅडेमी इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहीत करण्यात आले.
चिल्ड्रेन्स अकॅडेमी इंग्लिश मिडीयम शाळेच्या अनुष्का जाधव,इशांत शास्त्रकार,त्रिशा भोयर,नियती सत्रे,शौर्य घुमडे, तेजश्री उमाठे,आराध्य पडगेलवार,आतिफ खान,प्रणय घौरी, करमरकर या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे प्राप्त झाली आहेत. या स्पर्धेत मार्च २०२५ पर्यंत लावण्यात आलेल्या वृक्षांचे जतन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी साहित्यांचे वाटप, ऑनलाईन अॅप मधून संबधीत विद्यार्थ्यांना ऑटो जनरेटेड प्रमाणपत्र, उपक्रमात सर्वात यशस्वी कामगीरी नोंदविणाऱ्या पहिल्या पाच शाळांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त रवींद्र भेलावे, रवींद्र कळंबे,नागेश नित,चैतन्य चोरे,शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते.