मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेचे आज पुरस्कार वितरण

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेसह (भित्तीचित्र स्पर्धा) स्वच्छ सर्वेक्षणावर आधारीत विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राजे रघुजी भोसले नगरभवन ( टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी स्पर्धकांनी वेळेवर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेचे (wallpainting competition)आयोजन करण्यात आले होते. मनपाच्या या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेच्या माध्यमातून नागपूर शहराचा समृद्ध असा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा वारसा चित्रस्वरुपात जतन करण्याचे कार्य करण्यात आले आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर शहरातील विविध इमारतींच्या कुंपण भिंतींना चित्रकारांनी अधिक सुशोभित करून दाखविले आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील इमारतीच्या भिंतींवर नागूपरचा समृद्ध असा कलेचा वारसा झळकत आहे.

मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेत ६०३ हुन अधिक चित्रकारांनी शहर सौंदर्यीकरण च्या उद्देशाने कुंपण भिंतींना नाविन्यपूर्ण लूक देण्यासाठी कार्य केले. या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेत ५१५ महाविद्यालयीन विद्यार्थी गट आणि ८७ व्यावसायिक चित्रकार सहभाग नोंदवीत शहरातील इमारतींचे सौदार्यीकरण केले. या चित्रकारांना स्वच्छ भारत अभियानावर आधारित ३२ विषयाला अनुसरून शासकीय व निमशासकीय इमारतींच्या भिंतीवर चित्र काढले होते. याशिवाय मनपाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण यावर आधारीत विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे पुरस्कार देखील सदर कार्यक्रमात वितरित केल्या जाणार आहेत.

‘शून्य कचरा’ संकल्पनेसाठी सहकार्य करा

स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शून्य कचरा संकल्पना राबविण्यात येत आहे. या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेसह (भित्तीचित्र स्पर्धा) स्वच्छ सर्वेक्षणावर आधारीत विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा याच संकल्पनेवर आधारित असणार आहे. तरी हा पुरस्कार वितरण सोहळा पूर्णत: कचरा विरहित होईल यासाठी मनपा कटीबद्ध असून, उपस्थितांनी आपल्यामार्फत कचरा होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

Thu Jan 12 , 2023
मुंबई :- विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com