बदलत्या परिस्थितीस सामोरी जाणारी आरोग्य व्यवस्था निर्मितीस प्राधान्य द्यावे – आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे

पुणे :- बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राधान्य दिले जावे, असे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्यावत ठेवून त्यांचा नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतूनुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीवर सनियंत्रण ठेवावे, रोजच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्याशी समन्वय व नियंत्रण ठेवून पाठपुरावा करावा. जिल्हा व गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून रोजचा आढावा घेतला जावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सर्व भागधारकाशी प्रभावी समन्वयाने आरोग्य विभाग काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आणि आय. पी. एच. एस .(IPHS ) स्टँडर्ड नुसार आरोग्य प्रणालीसाठी वापरात येणाऱ्या सहा घटकांवर आधारित, जसे देण्यात येणाऱ्या सेवा, आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता, आरोग्य प्रणाली वित्त पुरवठा, नेतृत्व व शासन या सहा घटकावर भर देण्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.

आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख होण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत पुणे येथील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक व विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor Koshyari appeals to Corporates to support Palliative Care providers

Mon Oct 10 , 2022
Mumbai :- Stating that there is an urgent need to provide palliative care to the large number terminally ill elderly people in our society, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari called upon philanthropists and Corporates to extend a generous support to palliative care providers. The Governor was speaking at the commemoration of the World Hospice and Palliative Care Day, organised by […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com