मुंबई :- ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.
यावेळी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर – म्हैसकर, पोलीस आयुक्त (मुंबई शहर) विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, बृहन्मुंबई महानगरपालिाक अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे व राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,