देशवासियांना जोडून ठेवणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ – उज्वल रायबोले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

 कामठी प्रतिनिधि 27 ऑगस्ट : प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाणी ऐकायला मिळणं, ही एक पर्वणी आहे.’मन की बात’च्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी हा पूर्ण देश जोडून ठेवल्याचे भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी म्हटले आहे. (दि. २७ ऑगस्ट) रोजी १०४ वा मन की बात कार्यक्रम झाला. ते पुढे म्हणाले की, हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते, त्या सोबतच देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव केला जातो. मन की बात कार्यक्रम भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र पाहिला. यावेळी अरविंद चवडे, दिनेश खेडकर, रोहित दहाट, बादल कठाने, शंकर चवरे,हर्ष धुर्वे,अभिषेक कनोजे, राजेश चट्टी, संजय पटले,नरेश बर्वे आणि इतर कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचे विचार अनुभवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अरविंद सहकारी बँक लि.ची आर्थिक प्रगती व कार्य उल्लेखनीय - नितीन गडकरी 

Sun Aug 27 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते अरविंद सहकारी बँक लि.च्या कामठी शाखेचे उद्घाटन.  चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. सुलेखाताई कुंभारे, . सुधाकर कोहळे, रणजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी आणल्या ग्राहकांसाठी ४ नव्या योजना. कामठी ता प्र 27:-सहकारी बँकिंगमध्ये अरविंद सहकारी बँकेचे १००० कोटी रुपयांचे डिपॉझीट आणि १६०० कोटी रुपयांचे टर्नओव्हर ही मोठी उपलब्धी आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com