पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची केली घोषणा

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले:

” शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही ‘ पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करीत आहोत. 75,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवत 1 कोटी घरांना प्रकाशमान करण्‍याचे आहे. ”

” या योजनेच्या अनुदानापासून जे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल. ते मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, लोकांवर कोणत्याही खर्चाचा बोझा पडणार नाही याची खात्री केंद्र सरकार करेल. योजनेतील संबंधित सर्व भागधारकांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवर एकत्रित केले जाईल, त्यामुळे ही योजना राबवणे अधिक सुकर होणार आहे.’’

“या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्‍ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्‍यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल कमी येईल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल.”

“चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ करण्‍याचे आवाहन करतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षणासोबत कौशल्य विकास आवश्यक - न्या. सचिन पाटील

Thu Feb 15 , 2024
▪️ रोजगार मेळाव्यात १०२ विद्यार्थ्यांना नोकरी नागपूर :- देशाच्या प्रगतीसाठी कौशल्य प्राप्त मनुष्यबळाचा हातभार हा महत्त्वाचा आहे. त्यासाठी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम शालेय स्तरापासून समाविष्ट असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या मनात तांत्रिक शिक्षणाची आवड व उद्योजकतेची बीजे पेरल्यास देशाचे विकासासाठी त्याची मोठी मदत होईल असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर चे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com