देशात रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन

18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे ट्रान्समिटर्स आहेत

आकांक्षी जिल्हे आणि सीमावर्ती भागात कनेक्टिव्हीटी वाढवण्यावर विशेष भर

सुमारे 35,000 चौरस किमी क्षेत्राच्या वाढीव व्याप्तीसह अतिरिक्त 2 कोटी लोकांना आता रेडिओ कनेक्टिव्हिटी मिळू शकेल.

‘मन की बात’च्या 100 व्या भागाच्या दोन दिवस आधी हा रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्तार होणार आहे.

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमायून 100 व्हॅटच्या 91 एफएम ट्रान्समिटर्सचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे.

देशात एफएम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 W एफएम ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा तसेच लडाख आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह या केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे.

आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या या विस्तारामुळे, ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हीटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून सुमारे 35,000 चौरस किमी क्षेत्र विस्तारले जाणार आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात रेडिओ बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. मोठ्या प्रमाणात श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या या माध्यमाच्या अनोख्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला, जो आता लवकरच 100 व्या भागाचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लष्कर कमांडर्स परिषदेमध्ये घेण्यात आले महत्वाचे निर्णय

Thu Apr 27 , 2023
मुंबई :-प्रथमच हायब्रीड पद्धतीने 17-21 एप्रिल 23 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आणि नुकत्याच पार पडलेल्या लष्कर कमांडर्स परिषदेत, धोरणात्मक , प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास आणि प्रशासकीय पैलूंवर विस्तृत चर्चा करण्यात आली आणि भविष्यासाठी लष्कराला सज्ज ठेवण्याविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.लष्करी कमांडर्स आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याच्या / उद्भवणाऱ्या सुरक्षा परिस्थितींचा आढावा घेतला आणि भारतीय लष्कराच्या कार्यान्वयन सज्जतेचा आणि तयारीचा आढावा घेतला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com