राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.

            महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी यावेळी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

            राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार आहे. तसेच दि. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर येथे भेट देतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्राणी क्लेश टाळण्यासाठी प्रभावी जनजागृती आवश्यक  - जिल्हाधिकारी राजीव निवतकर

Fri Feb 11 , 2022
मुंबई : सामान्य जनतेमध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा तसेच प्राण्यांविषयीच्या विविध समस्या या विषयी प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेश समितीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी सांगितले.            जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई शहर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई शहर जिल्हा प्राणी क्लेश समितीचे सदस्य उपस्थित होते.            जिल्हाधिकारी श्री.निवतकर म्हणाले, मुंबई शहरातील भटके […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!