– ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरन
मुंबई :- महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते’वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ५ या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.