भिलगाव मुख्य रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात युवक कांग्रेसचे सामूहिक निवेदन सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याहुन ये जा करणाऱ्या वाहतुकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा या मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबात कामठी तालुका ग्रा युवक कांग्रेसचे अध्यक्ष निखिल फलके यांच्या नेतृत्वात कामठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना युवक कांग्रेसच्या वतीने सामूहिक निवेदन सादर करीत रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला.

कामठी तालुक्यातील मौजा भिलगाव येथिल स्वागत गेट ते शिव आर्केड भिलगाव पर्यंतचा रस्ता अत्यंत ख़राब झाला असुन रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पड़ले आहेत. त्यामूळे परिस्थितीवश मोठी जीवीतहानी होन्याची शक्यता नाकारता येंत नाही तेव्हा या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करुण देन्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करन्यात येईल असा ईशारा दिलेल्या निवेदनातून करण्यात आला. याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अनुराग भोयर , कामठी तालुक़ा सेवादल अध्यक्ष किशोर धांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माहेश्वरी संगठन,ज्योति महिला मंडल ने मनाया दिवाली मिलन

Wed Nov 22 , 2023
– घूमर नृत्य ने मोहा मन नागपुर :- महल के माहेश्वरी संगठन व ज्योति महिला मंडल के संयुक्त तत्वावधान में दिवाली मिलन व अन्नकूट महोत्सव का आयोजन डी. डी. नगर विद्यालय प्रांगण में किया गया। समारोह में मुख्य अतिथि राकेश भैया व सत्कार मूर्ति प्रभा भैया थे। मंडल के खुशालचंद भूतड़ा, शोभा सुरजन, कार्याध्यक्ष मधुसूदन बिंझानी, अध्यक्ष विजय कुमार लड्ढा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com