आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक

मुंबई :- केंद्रिय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात पूर्व तयारी करण्याविषयी केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व राज्याचे मुख्य सचिव यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन गद्रे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, वन विभागाचे प्रधान सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचा समारोप “मेरी माटी मेरा देश”, मिट्टी को नमन, विरोंका वंदन, ही संकल्पना घेऊन संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मार्च 2021 पासून सूरु झालेला या उपक्रमाचा ऑगस्ट 2023 अखेर समारोप होणार आहे. या समारोप उपक्रमात विविध विभागांच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक निर्माण कंपनीवर कारवाई

Sat Jul 22 , 2023
– कळमनातील जगदंबा प्लास्टिकवर मनपाचा छापा नागपूर :- महाराष्ट्र राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगचे उत्पादन करणाऱ्या एका फॅक्टरीवर नागपूर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने छापा टाकून फॅक्टरी सील केली आणि मोठ्या प्रमाणात 2187 किलो कॅरी बॅग्स जब्त केले. कळमना वस्ती येथील जगदंबा प्लास्टिकवर शुक्रवारी (ता. 21) छापा टाकण्यात आला. मनपा घनकचरा व्यस्थापन विभागाचे संचालक आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com