संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 17:-कोविड 19 संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्व स्वयंरोजगार व व्यावसायिक प्रशिक्षण ओळख कार्यक्रम कामठी पंचायत समिती कार्यालयात पार पडला.
याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी कार्यक्रमात उपास्थित महिलांना मार्गदर्शन करून सदर संधीचा योग्य फायदा घेऊन आयुष्यात उंचठिकान गाठावे असे मौलिक वक्तव्य करीत आपल्या परिवाराचा योग्य रित्या सांभाळ करणेबाबत शुभेच्छा दिल्या.
महाजिविका अभियान उपजीविका वर्ष 2022-23 उमेद महाराष्ट्र राज्य जिवोन्ननती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष प.स.कामठी अंतर्गत कोविड -19 च्या संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलासाठी स्वयंरोजगार संदर्भात R-seti (DRDA) व कौशल्य विकास विभागमार्फत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कामठी पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके ,प्रमुख अतिथी म्हणून कामठी पंचायत समिती सदस्य सविताताई जिचकार ,दीलीप वंजारी , सहाययक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले , जि.अभि.व्य..नागपूरचे शेखर गजभिये, गटशिक्षणाधिकारी .प्रदीप नागपुरे , नायब तहसीलदार आर जी उके पशुधन विस्तार.अधिकारी डॉ लीना पाटील,शशिकांत डाखोळे , आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे ,देशमुख बा.स.अधि.व ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्था RSETI,नागपूर यांचेकडून मनीष कुदळे , कु.गायकवाड,खैरी ग्रामपंचचे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे आदी उपस्थित होते. “या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली महिला व बाल कल्याण अधिकारी तसेच उमेद तालुका अभियान व्यवस्थापक.रविकुमार नान्होरे ,तालुका व्यवस्थापक अनुजा पाठक ,प्रभाग समन्वयक – अनिकेत तायडे, यांनी मोलाची भूमिका साकारली. याप्रसंगी .विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी R-seti व MCED टीम ने विधवा महिलांना स्वयंरोजगार बाबत,शेळीपालन, टेलरिंग,ब्युटी पार्लर,डाटा एन्ट्री ऑपरेटर, अगरबत्ती तयार करणे, इ.साठी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज भरून घेतले व महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक रोशन रंगारी यांनी तर समारोपीय आभार अनुजा पाठक यांनी पार पाडले.