बेला :- लोकजीवन शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा चंपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व लोकार्पण नुकतेच थाटात व उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरी झाले. याप्रसंगी साहित्यिक व निवृत्त प्राचार्य डॉ. मंजुषा सावरकर, डॉ. दिनकर व साधना वाकडे , सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता किशोर राम लांबट, अरुण देशपांडे, डॉ. सीमा बुचे,राजीव देशमुख, संस्था अध्यक्ष वर्षा बाभुळकर, उपाध्यक्ष बुलाराम तळवेकर, सचिव सुबोध देशमुख, संचालक प्रशांत लोहकरे, राजेंद्र तळवेकर, अशोक लांबट व शाळेचे प्राचार्य सुनील मुलेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिभाताई ह्या शिक्षिका, समाजसेविका, त्यागमूर्ती व सेवाव्रती होत्या. हा हिरा देशमुख साहेबांच्या सोन्याच्या कोंदनात अधिकच चकाकला असे गौरव उद्गार सावरकर यांनी यावेळी काढले.
इतर वक्त्यांनीही त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. लोकजीवन आदिवासी प्राथमिक शाळा कवडापूर येथील विद्यार्थ्यांनी सुशील मून यांच्या मार्गदर्शनात कोळी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. शाळा प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक संस्थापक अध्यक्ष यादवराव देशमुख, क्रांतिवीर राजाराम महाले, शिक्षणमहर्षी चंपतराव देशमुख यांची स्मारके आहेत. चारही स्मारकांना जोडणारा एक पथ तयार करण्यात आला आहे. त्यास समर्पक असे “प्रेरणापथ” नाव देण्यात आले आहे. प्राचार्य सुनील मुलेवार यांनी आभार प्रदर्शन केले. पर्यवेक्षक नितीन पुरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश लांबट, रोशन पवार, लक्ष्मण खोडके, आशिष देशमुख व संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.