नागपूर :- सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिट्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सालबर्डी येथे 20 फेब्रुवारी ते 23/02/2024 या चार दिवसांच्या कालावधीत साहसी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहाटे 5 वाजता सर्व मुले झेंडावंदनासाठी उपस्थित राहत त्यानंतर सकाळच्या रूट मार्चसाठी निघत. अमरावती जिल्ह्यातील, मोर्शी तालुक्यातील, सालबर्डी ‘हे पर्वतराजाच्या कुशीत वसलेले गाव आहे.
नैसर्गिकदृष्ट्या अतिशय संपन्न असलेल्या या गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी सर्व मुलांनी, शिक्षकगण तसेच पर्यवेक्षकांनी अतिशय कठीण असे ट्रेकिंग करून महादेवाचे दर्शन घेतले. दररोज दिवसभरामध्ये मुलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवले जात. मुले सुद्धा सर्व उपक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग दर्शवत असत. दररोज संध्याकाळी प्रेरणादायी संदेश असलेले चित्रपट मुलांना दाखवले जात .शिबिराच्या शेवटच्या दिवशी कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यात आला. मुलांनी नृत्य, गाणी, कला सादर केल्या. शिबिरामध्ये सकाळ -संध्याकाळ मेडिटेशन तसेच मुलांकडून प्रार्थना म्हणवून घेण्यात आल्या.
शाळेचे व्यवस्थापण तसेच मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर अशा नैसर्गिक वातावरणामध्ये शिबिराचे आयोजन केले होते. अशा या वातावरणाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. मुलांना हे गाव अतिशय आवडले. अतिशय सुंदर अशा स्मृती मनात साठवून मुलांनी परतीची वाट धरली. प्रहार मिलिटरी स्कूलचे सचिव अनिल महाजन यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात गिरीश भोगे व चमूनी मुलांसाठी अतिशय उत्तम अशी भोजन व्यवस्था केली होती मंगला भोजने तसेच अंबादास गेडाम यांनी राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यांच या शिबिरात सत्कार करण्यात आला.