संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रनाळा येथे कामठी मौदा विधानसभेचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ची महत्वपूर्ण आढावा बैठक प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे जिल्हा संयोजक किशोर कुंभारे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. याप्रसंगी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनचे सहसंयोजक अंगद जांगडे, सुरेश शाहु , रनाळा ग्रामपंचायतचे सरपंच पंकज साबळे ,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे ,स्वप्निल फुकटे, सी.एस.सी. सेंटर च्या संचालीका जयश्री श्रावणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी विश्वकर्मा योजना संबंधी आढावा घेण्यात आला. विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांच्या अडचणी संबंधी मार्गदर्शन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग फाउंडेशनचे सचिव बॉबी महेंद्र , पदवीधर आघाडीचे जिल्हा संयोजक प्रा.पराग सपाटे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीचे आयोजन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कामठी मौदा विधानसभा संयोजक अमोल नागपुरे यांनी केले.