– लाल वादळ येणार
नागपूर :-अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरात “महिला न्याय आंदोलन” दि. २९ ॲागष्ट २०२४ रोजी आयोजीत करण्यात आले आहे, त्याची पुर्व तयारी नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते याच्या नेतृत्वात सुरू करण्यात आले.
या महिला न्याय आंदोलनाच्या पुर्व तयारीसाठी देवडिया काँग्रेस भवन येथे नागपूर शहर (जिल्हा) महिला काँग्रेसच्या शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींची सभा महिला काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या निरिक्षक म्हणून प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष डॉ.संजीवनी बिहाडे ,विद्या पाटील,डॉ. रेखा चव्हाण ह्या उपस्थित होत्या.
शहर महिला काँग्रेस कार्यकारणीची देवडिया काँग्रेस भवन, चिटणीस पार्क,नागपूर येथे झालेल्या सभेत शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांनी महिला न्याय आंदोलन नागपूरात यशस्वी करण्यासाठी नागपूर शहरात ठिकठिकाणी बैठक घेवून या आंदोलनात हजारोंच्या संख्येने महिला जोडण्यासाठी प्रत्येक प्रभाग, ब्लॅाक अध्यक्ष व शहर कार्यकारणीचे पदाधिकारी यांना जबाबदारी दिली. प्रत्येक प्रभागातून १०० महिला या आंदोलनात जोडण्यात येतील असे नियोजन करण्याचे निर्देश दिलेत. या बैठकीत उपस्थित झालेले प्रदेश निरिक्षकांनी आंदोलनाच्या रूपरेषाबाबत मार्गदर्शन केले. नागपूरात दि.२९ ॲागष्ट २०२४ रोजी दुपारी होणाऱ्या महिला न्याय आंदोलनात महिलांनी लाल साडी अथवा लाल ड्रेस किंवा कोणतेही लाल कपडे परिधान करून यावे असे ठरले. शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारींनी सभेत उपस्थित राहून नागपूरातील महिला न्याय आंदोलन यशस्वी करण्यासाठी जबाबदारी शहर महिला कॅाग्रेसने स्विकारली आहे,असे ॲड.नंदा पराते यांनी सभेत जाहीर केले.