प्रदीप मैत्र विशेष सेवा सन्मानाने पोलीस नागरिक समन्वय समिती भारत तर्फे सन्मानित

नागपूर :- पोलीस नागरीक समन्वय समिती भारत तर्फे नुकतेच दिपावली व जन्मदिनाच्या औचित्याने जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र यांचा प्रवीण जी. राऊत प्रधान समन्वयक पोलीस नागरिक समन्वय समिती भारत यांचे हस्ते विशेष सेवा सन्मान पत्रशाल श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ विदर्भवादी नेते सुनील चोखारे, लॉयन्स क्लब ऑफ नागपूर हेल्थ सिटी अध्यक्ष डॉ. अरविंद बुटले, नानू नेवरे, इत्यादींची प्रमूख उपस्थिती लाभली. सबका भला हो जगमे यही कामना हमारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वाप्रमाणे प्रदीपकुमार मैत्र यांचे सुमारे कार्य 35 वर्षापासून सुरू आहे. सुरवातीच्या काळात अतिशय हालाकिच्या परिस्थिती मध्ये देखील आपला पत्रकारितेचा गाभा न विसरता त्यांचा प्रवास आज त्यांना महाराष्ट्र श्रमीक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घेऊन पोहचला. टिळक पत्रकार भवन ट्रस्ट,प्रेस क्लबच्या माध्यमातून देखील त्यांच्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक समन्वय कार्य देखील अतिशय महत्वपूर्ण ठरले आहे. श्रमीक पत्रकारांच्या अनेक अडचणी, मागण्या सवलती शासनप्रशासना कडून त्यांनी पुर्णत्वास नेल्या आहेत. पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम, जेष्ठ व विशेषतः उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांनाही त्यांनी अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मानित करून पत्रकार परीवार प्रमूख म्हणून त्यांनी आपली रोखठोक भुमिका निभावली आहे. पत्रकारा व्यतिरिक्त देखील कुणी सर्वसामान्य नागरिक महीला शेतकरी किंवा शोधित पिडीत त्यांच्याकडे गेल्यास त्याची अडचण समस्या समजून घेऊन ती सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न खरच वाखाणण्या जोगा आहे. करीता प्रदीपकुमार मैत्र यांना पोलीस नागरिक समन्वय समिती भारत तर्फे दिपावली व त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने विशेषसेवासन्मानाने सन्मानित करण्यातआले. प्रसंगी ढासळलेली आरोग्य व्यवस्था, शिक्षणाचे बाजारीकरण, वाढलेले शिक्षण शुल्क, शेतकरी आत्महत्या, कुटुंब समुपदेशनाची आवश्यकता इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.आज देशाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तत्वांची गरज असून मिही त्यांच्या विचारांचा चाहता आहे असे विचार मैत्र यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे, डॉ.शंकरराव चोखारे यांचा सुद्धा आदराने उल्लेख केला. पोलिस नागरिक समन्वय समिती व सुनील चोखारे यांचे आभार मानले. भविष्यात पत्रकार संघटनांच्या माध्यमातून चांगली जनसेवा घडो अशा शुभेच्छा दिल्या. प्रवीण जी. राऊत प्रधान समन्वयक पोलीस नागरिक समन्वय समिती भारत यांनी सत्कार प्रसंगी जाहीर रुपाने व्यक्त केल्या

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनसर खदान में कबड्डी और वॉलीबॉल टूर्नामेंट का भव्य उद्घाटन

Tue Nov 1 , 2022
– खान प्रबंधक मनीष ढोके ने किया उद्घाटन – प्रतियोगिता में 9 खानों के प्रतियोगियों ने भाग लिया रामटेक :-  मनसर – रामटेक मार्ग पर स्थित मनसर खान मे आज ३१ ऑक्टोंबर को कबड्डी और हॉलीबॉल स्पर्धा का बडे उत्साह से मनसर माईन के प्रबंधक मनीष ढोके इनके हातो किया गया। उद्घाटन के इस अवसर पर मुख्य रूप से मि. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com