नागपूर :- शेतक-यांच्या कृषी पंपांना योग्य दाबाने व गुणवत्तापौर्वक वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणच्या सावनेर विभागांतर्गत असलेल्या मोहपा उपविभागातील 33 केव्ही तेलगाव उपकेंद्रात अतिरिक्त 5 एमव्हीए क्षमतेचा रोहीत्र बसविण्यात आला आहे. या पॉवर ट्रान्सफ़ॉर्मरचे चार्जिंग महावितरणच्या नागपूर मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषी ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतून तयार करण्यात आलेल्या कृषी अकस्मिकता निधीतून हा रोहीत्र बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या पॉवर ट्रान्सफ़ॉर्मरमुळे परिसरातील गावांतील शेतक-यांना गुणवत्तापुर्वक आणि दर्जेदार वीजपुरवठा योग्य दाबाने मिळणे सहज शक्य होणार आहे. या पॉवर ट्रान्सफ़ॉर्मरच्या चार्जिंग प्रसंगी सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दिपाली माडेलवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत ठाकरे यांचेसमवेत सहाय्यक अभियंता दिपीका पटले, आणि कनिष्ठ अभियंते सर्वश्री प्रफ़ुल्ल वडबुधे आणि अमोल राऊत उपस्थित होते.