नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत येणा-या मोवाड येथे नगर परीषद कॉम्प्लेक्स जवळ आठवडी बाजार येथे मंजुषा आमटे या महीलेला कोणीतरी अज्ञात इसमाने जिवानीशी ठार मारून तिला बाजुला असलेल्या नालीचे चैवरमध्ये टाकले. यावरून दिनांक १८/७/२०२३ रोजी पोलीस स्टेशन नरखेड येथे अपराध क २९५/२३ कलम ३०२,२०१ भादवि अंतर्गत दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयीत युवकाबाबत माहीती मिळाली कि, दोन युवक हे गावातुन मोटर सायकल चोरी करून नागपुर च्या दिशेने गेले आहे. सदर संशयीत आरोपीचा सीसीटिव्ही आणि तांत्रिक रित्या शोध घेतला असता ते चोरी केलेल्या मोटर सायकलने वानाडोंगरी, हीगणा, आणि बुट्टीबोरी हद्दीत गेल्याचे समजले. व पूढे रेल्वेने सेवाग्राम रेल्वे स्टेशन व तेथुन हैद्राबादचे दिशेने गेल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून हैद्राबाद येथे पाठविण्यात आले. सदर पथकाने आरोपीचा हैद्राबाद येथे शोध घेतले असता आरोपी हे सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून जगतगिरीगुट्टा येथे असल्याची माहीती मिळाली. व तिथे एक दिवस थांबुन एक कंत्राटी ठेकेदारा मार्फत दोन्ही आरोपी जिल्हा हिंगोली येथील शिरुड शहापुर येथे गेल्याबाबत समजले. तिथे जावून परीसरात त्यांचा शोध केला असता दोन्ही आरोपी शिरुड शहापुर येथून ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव पत्ता विचारून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले कि, मंदीर चोरी करतेवेळी सदर महीलेने चोरी करतांनी पाहील्यामुळे तिला ठार मारून मोटरसायकल चोरी करून पळुन गेल्याचे सांगितले..
नाव आरोपी : १. हरीश रामदास धीरसागर वय २४ वर्ष र मोवाड ता नरखेड जि नागपुर
२. शुभम बिंदे धुर्वे वय १९ वर्ष रा चांदगाव जि छिंदवाडा मध्यप्रदेश
उघडकीस आलेले गुन्हे :- पोलीस स्टेशन नरखेड अप क २९६/२३ कलम ३७९ भादवि अप के २९७/२३ कलम ३७९,५११ भादवि
सदरची कारवाई विशाल आनंद (पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण) संदीप पखाले अपर पोलीस अधिक्षक, बापू गंगाधर रोहम उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि राजीव कर्मलवार, अनिल राउत, आशिपसिंह ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोहवा ईकबाल शेख, पोशि राहुल साबळे, निलेश इंगुळकर, तसेच सायबर सेल के पोना सतिश राठोड, कुणाल राऊत यांचे पथकाने केली आहे.