पोलीस पित्याचा रेल्वे अपघाती मृत्यु.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यादवनगर रहिवासी व पोलीसपदी नोकरीवर असलेल्या पोलीस पित्याचा रमानगर रेल्वे क्रॉसिंग मार्गावरील तारा माता मंदिर जवळ रेल्वे गाडीच्या धक्क्याने जागीच अपघाती मृत्यु झाल्याची घटना गतसायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक पोलीस पित्याचे नाव शिवलाल मिठठूलाल यादव वय 61 वर्षे रा यादव नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे मुले पोलीस खात्यात असून मृतक हे दैनंदिन कार्याप्रमाणे चरायला गेलेले गाई म्हशी घरी आणण्यासाठी गेले असता सदर घटनास्थळी झालेल्या रेल्वे अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्याहेतु मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'जत्रा शासकीय योजनांची' अभियानाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

Thu May 4 , 2023
योजनांच्या लाभाकरिता झोन कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी नागपूर :- जनकल्याणकारी विविध योजनांचा सर्वसामान्यांना सहजरित्या लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे ‘जत्रा शासकीय योजनांची- सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान सुरू केले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे बुधवार ३ मे पासून दहाही झोन कार्यालयातून शहरात योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. बुधवारी (ता.३) अभियान अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी अभियानाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com