नागपूर :- नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या १२९ पोलीस शिपाई पदासाठी एकुण १५२० उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २४/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी वारंगा नागपूर येथे MNLU चे व्हाईस चान्सलर विजेंद्र कुमार यांचे परवानगीने घेण्यात आली. तसेच पोलीस शिपाई चालक पदासाठी एकुण ९२ उमेदवारांची लेखी परीक्षा ही आज दि. २६/०७/२०२४ रोजी पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथील बहुउद्देशीय हॉल येथे पार पडली. परीक्षार्थीना पोलीस प्रशासनाकडुन पेन आणि पॅड पुरविण्यात आले. तसेच मोवाईल किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात आणण्यास मनाई करण्यात आली होती. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी वारंगा नागपूर येथील प्रोफेसरांनी पर्यवेक्षक म्हणून प्रत्येक क्लास रूमध्ये अत्यंत जवाबदारीची भुमिका पार पाडली आहे.
लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यात आली असुन त्यामध्ये कोणत्त्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. लेखी परीक्षेच्या अनुशंगाने नागपूर ग्रामीण पोलीस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली होती. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये व कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती प्रत्यक्ष अवगत करून द्यावी, असे आवाहन हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे वतीने करण्यात आले होते.
उमेदवारांची लेखी परीक्षा पोलीस भरतीकरीता ०१ पोलीस अधीक्षक, ०१ अपर पोलीस अधीक्षक, ०१ सहायक पोलीस अधीक्षक, ०६ उपविभागीय पोलीस अधिकारी, २२-पोलीस निरीक्षक, ६७ पोलीस अधिकारी, २४६- पोलीस अंमलदार यांचा चोखपणे बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला होता. तसेच चालक लेखी परीक्षा पोलीस भरतीकरीता ०१- पोलीस अधीक्षक, ०१- अपर पोलीस अधीक्षक, ०२-उपविभागीय पोलीस अधिकारी, ०५-पोलीस निरीक्षक १८ पोलीस अधिकारी व ७८ पोलीस अंमलदार असा याप्रमाणे पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला होता.