संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दोन आरोपीना अटक, एकुण ११,८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाका जवळील लोटस लॉजिंग & बोर्डिग येथे सुरु असलेल्या देह व्यवसायावर कन्हान पोलीसांनी धाड मारुन दोन आरोपी ला अटक करुन त्याच्या जवळुन एकुण ११,८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील तपास सुरु केला आहे.
फ्रीडम फर्म सामाजिक संस्था नागपुर सदस्याना माहिती मिळाली की, नागपुर बॉयपास चारपदरी महा मार्गावरील बोरडा टोल नाका जवळील लोटस लॉजिंग & बोर्डिगचे मॅनेजर /मालक हे स्वतःचे आर्थिक फाय द्याकरिता मुलींना व महिलांना अधिक पैशाचे आमिश देऊन त्यांना देह व्यवसायास प्रवृत्त करून त्यांचे कडुन देहव्यवसाय करून घेत आहे. अश्या माहितीवरून सोमवार (दि.१४) ऑगस्ट ला दुपारी संस्थेचे पुरुष व चार महिला सदस्यानी कन्हान थानेदार सार्थक नेहाते याना माहिती देऊन पोलीस पथकासह सदर ठिकाणी बोगस ग्राहक म्हणुन पुढे रुपेश कुमार जिवस्तलाल बघेल वय ३० वर्ष रा. घटाटे ले आउट सिव्हील लाईन नागपुर यास त्याचे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन मुलीची मागणी करण्याचे व मुली मिळाल्यावर मिस कॉल द्वारे इशारा करण्याचे समजावुन त्यास पुढे पाठवुन दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांनी सदर ठिकाणी जाऊन धाड टाकण्याचे मौखिक आदेश दिल्याने पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते हे स्टाफ सह शासकीय वाहनाने कार्यवाही करण्यासाठी लपटॉप, मिंदर सील सह अन्य साहित्य घेऊन दुपारी ३ वाजता रवाना होऊन लोटस लाॅज पोहचण्यापुर्वी काही अंतरावर थांबवुन बोगस ग्राहकाचे मिस कॉल ची वाट बघत असतांना ३.३० वाजता पोलीस निरिक्षकांना बोगस ग्राहकाचा मिस काॅल आल्याने कन्हान पोलीसांनी लोटस लाॅज येथे धाड टाकुन रूमची झडती घेतली. रूमचे डस्ट बिन मधुन दोन वापरलेले कंडोम, १ नविन स्टाईल कंपनीचे कंडोम पॅकेट किंमत २० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिडीत मुलींनी सांगितल्याने पोलीसांनी लाॅज मध्ये मिळुन आलेले इसम १) अभय राजहंस सूर्यवंशी वय २१ वर्ष रा. कुंभारे कॉलोनी कामठी, २) दिलीप शालीकराम राऊत वय ४७ वर्ष रा. कांद्री यांना ताब्यात घेऊन दोन्ही पंचासमक्ष झडती घेत दिलीप राऊत यांचे कडुन बोगस ग्राहकाने दिलेले ५०० रुपयांचा ८ नोटा एकुण ४००० रुपये व एक सॅमसंग कंपनी स्मार्ट फोन किं. ५००० रुपये असे साहित्य मिळाले व काऊंटरवर हजर अभय सूर्यवंशी याचे जवळुन काउन्टर मधुन ५०० रुपयाचे ५ नोटा एकुण २५०० रुपये आणि ग्राहकांना मुलगी पुरविल्यावर देण्यात येणारे स्टाईल कं नीचे कंडोमचे १३ पैकेट २० रुपये प्रमाणे २६० रुपये, जरुर कंपनीचे ३ लहान पॅकेट किंमत २२ रुपये प्रमाणे ६६ रुपये लाॅज मध्ये येणाऱ्या लोकांचे नाव नोंदणी लॉजिंग रजिस्टर असा एकुण किंमत २८२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर तीन्ही ठिकाणातुन पोलीसांनी ६५०० रु नगदी, ३४६ रु चे नवीन कंडोम, लॉजिंग चे रजिस्टर व एक मोबाईल किंमत ५००० रु असा एकुण ११,८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी दोन आरोपींना अटक करित सरकार तर्फे फिर्यादी सपोनि सी. बी चव्हाण यांचे तक्रारीने पोस्टे ला आरोपी अभय राजहंस सूर्यवंशी, दिलीप शालीक राम राऊत यांचा विरुद्ध अप क्र. ५२८/२०२३ कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार अधिनियम १९५६ सहकलम ३७० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे. ही कारवाई कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते, सपोनि सी.बी चव्हाण, मुदस्सर जमाल, आकाश सिरसाट, नविन पाटील, आशिक कुंभरे, विना राऊत, भाग्यश्री राऊत सह इतर पोलीस कर्मचा-यांनी शिताफितीने केली.
विशेष म्हणजे लोटस लॉजिंग & बोर्डिगचे हा जिल्हयाच्या सत्ताधारी एका राष्ट्रीय पार्टी च्या नेत्याच्या जवळच्या पदाधिका-यांचा असल्याचे बोलले जात असुन यात पार्टी च्या एका सेलच्या माजी जिला पदाधिकारी तसेच तहसिल पदाधिकारी आणि एका नेत्याचा भाऊ असे तिघे पार्टनरशिप मध्ये लॉज चालवित आहे.