नागपुर – पोलीस ठाणे सदर, नागपूर हद्दीतील ब्रदर्स कॅफे, बुटी कॉम्प्लेक्स, हंगरी आईज च्या मागे, माउन्ट रोड, नागपुर येथे पोलिससाना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पो.ठाणे सदर येथील वरिष्ट पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी सहकर्मचारी यांचे समवेत सापळा रचुन नियोजित पध्दतीने छापा टाकुन कार्यवाही केली असता. ब्रदर्स कॅफे येथे दोन सोफ्यावर तिन पुरूश ईसम आमोरा समोर बसुन एका टेबलावर प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ असलेला हुक्का पितांना मिळुन आले. सदर ठिकाणा वरून एकुण 7 नग हुक्का पॉट व त्यासंबंधीत साहित्य आणि प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ असा संपुर्ण एकुण कि. 27,860/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रस्तुत गुन्ह्याातील आरोपी नामे 1) जॉन्टी षालुमन फिलिप्स वय 24 वर्श, रा. सेन्ट मार्टिन नगर, एफ. 6, जरीपटका, नागपूर. ( ब्रदर्स कॅफे चालक/मालक) 2) मार्षल जेम्स फिलीप्स, वय 32 वर्श, रा. सेन्ट मार्टिन नगर, ए. 61, जरीपटका, नागपुर. ( हुक्का पुरविणारा ) यांनी ग्राहक नामे 3) पंकज महेन्द्रसिंग गोलछा, वय 34 वर्श, रा. कराची गल्ली, मोठ्याा मस्जिदमागे, सदर, नागपूर 4) गुरूदिपसिंग राजेंन्द्रसिंग कबोत्रा वय 26 वर्श, रा. प्लॉ.नं. 11, इंटस्ट्रियल एरिया, कामठी रोड, नागपूर. 5) मॉरेस मोबीन परेरा वय 36 वर्श, रा. 36 बी, मार्टिन नगर, जरीपटका, नागपूर. यांना प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थावर बंदी असतांना सुध्दा चेतावणी लिहिलेले तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करून ग्राहकांना हुक्का पुरवुन सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने ( जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन ) अधिनियम 2003 दिनांक 04/10/2018 महाराश्ट्र सुधारणा अधिनियम अंतर्गत कलम 4 (अ), 21 (अ) चे उल्लंघन केल्याने त्यांचे विरूध्द सदरचा गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील गुन्ह्यााचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई नागपूर शहराचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. 02, . डॉ. संदिप पखाले, सहायक पोलीस आयुक्त, सदर विभाग, माधुरी बावीस्कर, यांचे मार्गदर्शना मध्ये वरिष्ट पोलीस निरीक्षक, विनोद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक, सुधीर कोडापे, पो.हवारविन्द्र लाड, दिलीप कश्यप , ना.पो.अं. प्रमोद क्षिरसागर, प्रमोद, श्रीकृष्ण , रत्नाकर, पो.अं.चन्द्रशेखर , बालवीर, म.पो.अं. आरती यांनी केली आहे.