बनावटी अवैद्य मद्य वाहतुकीवर पोलीसांची धडक कारवाई; एकुण 36,86000/-रू चा मुद्देमाल  जप्त..

नागपूर – बनावटी अवैधरीत्या देशी दारू बाळगून वाहतूक करून चंद्रपूर ते नागपूर विक्रीस जाण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून बनावटी अवैधरीत्या देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या मद्य साठा व वाहन जप्त करून कारवाई केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे  दि 11/8/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांचे पथक उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना बतमीद्वारा महिती मिळाली की चंद्रपूर ते नागपूर रोडणे एका लाल रंगाच्या आईसर गाडी मधे बनावटी अवैधरीत्या देशी दारू बाळगून वाहतूक होत आहे अश्या खबरे वरून पोलिस ठाणे बेला हद्दीतील सोनेगाव फाटा येथे नाकाबंदी करीत असताना सदर वाहन चालकाने आपले वाहन बेला गावाच्या दिशेने वळविल्याने सदर गाडीचा पाठलाग करुन दहेली शिवर येथे पकडुन चालकास ताब्यात घेउन विचारपूस केली असता  चालकाजवळ इंदोर येथील Senitech project Ruturaaj business centre Indore ची TP ज्यामध्ये लम्बिमया माल असल्याबाबतची बनावट व खोटी मिळून आली. आरोपीस सखोल विचारपूस मध्ये सदर माल इंदोर येथून रिंकू राठी याने भरून दिला व सिरोंचा येथे नेत असल्याचे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातून विनापरवाना व अवैधरीत्या देशी दारु वाहतुकी बाबतचे कोणतेही कागदपत्र त्यांचे जवळ नसल्याचे सांगितले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये एका खाकी रंगाच्या बॉक्स मध्ये देशी दारू रॉकेट संत्रा 90 ml च्या प्लास्टिक शिशीच्या एकून 100 निपा असे एकूण 480 बॉक्स  त्यात एकुण 48000 बॉटल 90 ml ची प्रत्येकी 35/- रु असा एकूण किंमती 16,80,000-/- रु चा माल व  आइसर गाडी क्रमांक UP- 12-BT-9335 किंमती 20,00,000 सह  2 मोबाईल किंमत 6000/- असा एकुण किंमती 36,86,000/- रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांचे रिपोर्टवरून पो स्टे बेला येथे आरोपीविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७९ १०९ भादवि सहकलम ६५ A,E. ९० महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपीला अटक करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन बेला यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई  पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) विशाल आनंद तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले  यांचे मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड नागपूर विभाग, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनी आशीष मोरखडे , HC मिलिंद नांदूरकर, महेश जाधव, संजय बांते, अरविंद भगत ,मयूर ढेकले , साजिद सय्यद, NPC रोहन डाखोरे, अमृत किनगे, रोषण बावणे, PC राकेश तालेवार ,राहुल साबळे ,चापोशि सुमित बांगडे , आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महसूल व रेल्वे विभागांनी समन्वयातून विकासकामांना गती द्यावी - विजयलक्ष्मी बिदरी

Sat Aug 12 , 2023
नागपूर :- रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडील रेल्वेशी संबंधीत विकास कामांना प्राथमिकता द्यावी. तसेच, रेल्वेची नागपूर महसूल विभागात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांसाठी सहाही जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रेल्वे विभागाला आश्वस्त केले. नागपूर विभागात सुरू असलेल्या रेल्वे व तत्सम इतर पायाभूत प्रकल्पांच्या कामातील अडचणींबाबत महसूल व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com