कोळसा चोरुन वाहतुकीच्या टाटा पिकअप वाहन पोलीसांनी पकडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दगडी कोळसा आणि वाहना सह एकुण चार लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान :- परिसरातील गोंडेगाव वेकोलि डपिंग यार्ड चा कोळसा चोरुन वाहतुक करणाऱ्या पिकअप वाह नाला कन्हान पोलीसांनी पकडुन दगडी कोळसा व वाहना सह एकुण चार लाख बारा हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करुन पोस्टेला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना सुचना पत्र देऊन सोडण्यात आले.

प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.८) सप्टेंबर ला रात्री ११.३० वाजता कन्हान पोलीस स्टाफ पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात तपासाकरिता सरकारी वाहनाने पोस्टे परिसरातील गोंडेगाव वस्तीत पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एका पांढऱ्या रंगाचा पिकअप मध्ये चोरी केलेला कोळसा भरून अवैधरित्या वाहतुक करित आहे. अश्या मिळालेल्या माहितीने पंचासह पोलीसांनी गोंडेगाव येथे शितला माता मंदीर रस्त्यावर नाकाबंदी केली. असता पांढऱ्या रंगाचा जेनान पिक अप गोंडेगाव वस्तीतुन बाहर येतांना दिसुन आल्याने पोलीसांनी वाहन रस्त्याचा कडेला थांबवुन पोलीसांनी वाहनाची पंचा समक्ष पाहणी केली असता वाहनाचे मागिल बाजुस ताळपत्राळी खाली दगडी कोळसा भर लेला दिसुन आला.

वाहन चालका सोबत इतर दोन इसमाना वाहना खाली उतरवुन त्यांचे नाव गाव विचारले. वाहन चालक १) संदीप शिवप्रसाद पटले वय ३१ वर्ष रा. सालई खुर्द ता.मोहाडी जि.भंडारा ह मु चैतराम शरनागते टेकाडी,२) अश्विन गेंदलाल वाढिवे वय २६ वर्ष,३) लहु झोलबा सहारे वय २९ वर्ष दोन्ही रा. महा दुला ता. रामटेक सांगितले. पोलीसांनी त्यांचे सहमती ने अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन काहीही मिळुन आले नाही. तसेच वाहनातील दगडी कोळसा मालक व कागद पत्र विचारले तर आरोपींनी कोळसा हा शैलेश कडबे यांचे मदतीने डंपीग यार्ड गोंडेगाव येथुन चोरला व कोळसा चोरी साठी शैलेस कडबे यांनी प्रत्येक ट्रिप साठी ड्रायव्हर ला २,००० रू तसेच सोबत असलेल्या दोघांना १,००० रू प्रत्येकी मजुरी देण्याचे कबुल केल्याने चोरलेला कोळसा विक्री करिता घेवुन जात होतो. असे वाहन चालकाने सांगितल्याने पोलीसांनी पांढऱ्या रंगाचा टाटा जेनान वाहन क्र. एम एच ४९ डी ०९८८ चे कागदपत्रा बाबत विचारपुस केली तर ते नसल्याचे वाहन चालकांनी सांगितल्याने पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन टाटा जेनान पिक अप वाहन क्र. एम एच ४९ डी ०९८८ अंदाजे किंमत ४ लाख रुपये, ३ टन दगडी कोळसा १२ हजार रुपये असा एकुण ४,१२,००० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी पो. ना महेन्द्र जळीतकर यांचे तक्रारी वरून संदीप शिवप्रसाद पटले, अश्विन गेंदलाल वाढिवे व लहु झोलबा सहारे यांचा विरुद्ध अप क्र.५८६/२३, कलम ३७९, ३४, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना सुचना पत्र देऊन सोडण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक राजेश जोशी, फौजदार सदाशिव काटे, पोलीस नायक महेंद्र जळीतकर, पोलीस काॅस्टे बल वैभव बोरपल्ले, सम्राट वनपर्ती , निखिल मिश्रा सह आदी पोलीस कर्मचा-यांनी कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एक राष्ट्र एक चुनाव: चर्चा से श्रोताओं की शंकाएं दूर हुईं

Sun Sep 10 , 2023
– एक राष्ट्र; एक चुनाव संकल्पना सही नहीं: एडवोकेट फ़िरदौस मिर्ज़ा – एक देश; देश के लिए लाभदायक चुनाव : एड. श्रीरंग भंडारकर – लोकगर्जना प्रतिष्ठान की ओर से चर्चा नागपुर :- भारत के प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने “एक राष्ट्र एक चुनाव” की घोषणा की। इसके लिए उन्होंने एक कमेटी का गठन किया. जो कार्यान्वयन के लिए आवश्यक कानूनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com