सट्टापट्टी लिहताना संजय गुप्ता यास पोलीसानी पकडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील नागपुर बॉयपास टेकाडी पुला खाली काही लोकाकडुन पैसे घेऊन सट्टापट्टीचा जुगार खेळविताना संजय गुप्ता यास कन्हान पोलीसानी पकडुन त्याचे विरूध्द कारवा़ई केली.

शनिवार (दि.१८) मे ला सायंकाळी ३.५० वाजता कन्हान पोस्टे चे सपोनि राहुल चव्हाण व पोलीस कर्मचारी सरकारी वाहनाने पेट्रोलिंग तसेच अवैद्य धंद्यावर कारवाई करणे करिता फिरत असताना टेकाडी वसाहत जवळ गुप्त माहिती मिळाली की मौजा टेकाडी शिवारातील बॉयपास पुलाचे खाली आशीयाना ढाब्या जवळ एक संजय गुप्ता नावाचा इसम ज्याने अंगात रेगाटी शर्ट व शेंदरी दुपट्टा घातलेला असुन तो लोकां कडुन पैशे घेवुन सट्टापट्टीचा जुगार खेळवित आहे. यावरून पोलीसानी नमुद ठिकाणी लपत गेले असता वरील वर्णनाचा इसम हा काही लोकांकडुन पैशे घेवुन एका कागदी पट्टीवर काहीतरी लिहिताना दिसुन आल्याने स्टाफसह सदर इसमावर रेड केली असता तेथे हजर असलेले काही पळुन गेले व रेघाटी शर्ट व शेंदरी दुपट्टा घातलेला इसम संजय रामदास गुप्ता वय ४६ वर्षे रा. वार्ड क्र.४ जय दुर्गा नगर कांद्री ता. पारशिवनी हा मिळुन आल्याने त्याची अवैध सट्टापट्टी बाबत अंगझडती घेतली असता त्याचे जवळुन ३२० रूपये नगदी, सट्टापट्टीचे आकडे लिहिलेला एक कागद, एक निळ्या रंगाचा बॉल पेन किमत ३ रुपये असा एकुण ३२३ रूपयाचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी हरिष सोनभद्रे यांचे तक्रारी वरून आरोपी संजय रामदास गुप्ता यांचे विरूध्द कलम १२ (अ़) म. जु. का अन्वये गुन्हा नोंद करून त्यास सुचना पत्र देऊन सोडण्यात आले.

सदर कार्यवाही कन्हान थानेदार वरिष्ट पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हाण, पोहवा हरिष सोनभद्रे, नापोशि अमोल नागरे, अनिल यादव, दिपक कश्यप आदीने यशस्विरित्या पार पाडली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात  दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

Mon May 20 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 धुळे- 39.97 टक्केhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 दिंडोरी- 45.95 टक्केhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 नाशिक – 39.41 टक्के पालघर- 42.48 टक्के भिवंडी- 37.06 टक्के कल्याण – 32.43 टक्के ठाणे – 36.07 टक्के मुंबई उत्तर – 39.33 टक्के मुंबई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com