सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक २२/०६/२०२४ रोजी मुखबीरये खबरेवरून गांधी चौक सावनेर येथे एक इसम पांढ-या रंगाची अॅक्टीवा क्रमांक एम पी २८ एस एच २४३८ घेवुन जात असलेल्या खात्रीशीर खबरेवरून सदर इसमाला थांबवुन त्याचे वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या वाहनाचे डिक्कीत विदेशी दारू १) इंपिरिअर ब्लु च्या ०९ निपा प्रत्येकी १८० एम.एल प्रत्येकी किमत १६० रू प्रमाणे किंमत १४४०/- रू २) ऑफिसर चॉईस प्लास्टीक निपा ०७ निषा प्रत्येकी १८० एम.एल प्रत्येकी किमत १२५ रू प्रमाणे किंमत ८७५/- रू असा एकून २३१५/- रू था माल विक्री करीता वाहतुक करताना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन अॅक्टीवा गाडी क एम.पी २८ एस.एब २४३८ किंमती २५०००/-रूव २३१५ /- रू. चा माल असा एकुन २७,३१५/- रू चा माल अवैधरित्या विनापरवाना मिळुन आल्याने आरोपी नामे- जगदिश भुरेलाल उईके वय ३६ वर्ष रा. वार्ड क ३ खौरी तायगाव ता सौंसर जि. पांढुर्णा यांचे विरूध्द पोस्टे सावनेर येथे कलम ६५ (इ) (अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, पोहवा बंडु कोकाटे पोस्टे सावनेर पार पाडली.