पो.स्टे. बुट्टीबोरी हद्दीमधील सट्टापट्टी लिहणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई

बोरी :- दिनांक १२/०७/२०२४ रोजी पोस्टे बोरी येथील स्टाफ पोस्टे बोरी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, एक इसम हा बोरखेडी रेल्वे गावाच्या गेटजवळ बसून अवैधरीत्या सट्टाप‌ट्टीवर लोकांकडुन पैसे घेवुन स‌ट्टाप‌ट्टीचे आकडे लिहुन जुगाराचा खेळ खेळवत आहे. अशा माहिती वरून बुट्टीबोरी येथील बोरखेडी रेल्वे गावाच्या गेटजवळ सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे संजय वसंतराव नंदनवार वय ५२ वर्ष रा. प्लॉट क्र. ७९ खारबी रिंग रोड गजानन हायस्कुल जवळ चौतनेश्वर नगर खरबी नागपूर ह. मु. बोरखेडी हा स‌ट्टाप‌ट्टीचे आकडे लिहताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता निळ्या शाईचा रंगाचा पेन किंमती अदाजे ५/-रू. व पांढ-या रंगाचा कागदावर आकडे लिहलेले व त्याचा कडून लोकांकडून घेतलेले नगदी १९७०/-रू. असे एकून १९७५/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे बोरी कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही हर्ष पोहार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.),  रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.) यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे बोरी येथील ठाणेदार हृदयनारायण यादव, पोहवा प्रविण देव्हारे, अरूण कावळे, पोशि गौरव मोकळे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे. कन्हान हद्‌दीतील अवैध जुगार अड्‌डयावर धाड

Mon Jul 15 , 2024
कन्हान :-यातील फिर्यादी दिनांक १३/०७/२०२४ रोजी पोस्टे कन्हान येथे हजर असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती मिळाली कि, न्यु मार्केट कन्हान मच्छी मार्केट जवळ “रामु यादव हा आपले मालकीचे साई रेस्टॉरन्ट बिल्डींग मध्ये जुगाराचा गुत्ता चालवित असुन काही इसम जुगार खेळ खेळत आहे.” असे मिळालेल्या विश्वसनीय माहीती वरून पोलीस स्टॉफसह न्यु मच्छी मार्केट कन्हान येथे रेड केली असता एकुण १० इसम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!