– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई
रामटेक :-दिनांक ०५/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रमीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन रामटेक परीसरातील पो.स्टे रामटेक हद्दीतील मगरवाडी गावाजवळ जंगलात काही इसम हे तासपत्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मरारवाडी गावाजवळ जंगलात सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे-१) विजेंद्र विष्णु सहारे, वय ३६ वर्ष, रा. मरारवाडी ता. रामटेक, २) प्रमोद कांतीलाल खैरे वय ३० वर्ष से मरारवाडी ता रामटेक ३) कापूरचंद भैयाजी ढवळे वय ४८ वर्ष रा. वाईतोला ता. रामटेक ४) रोशन वासुदेव वापधारे वय ३० वर्ष रा. खुमारी ता रामटेक ५) जितेंद्र जिवानसिंग पंडेले वय २९ वर्ष रा. खुमारी ता रामटेक ६) आकाश रामदास वांगे वय २४ वर्ष रा. भोंडे वाडा ता रामटेक ७) स्वप्नील चेतराम हेनकुळे वय २६ वर्ष रा. भोंडे वाडा ता रामटेक असे एकुण ०७ इसम हे तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन हरजीतचा जुगार खेळतांना मिळुन आले, असे एकुण ०७ जुगारी इसम यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन दोन मोटरसायकल किंमत ६५००० रु व रोख रक्कम १०७०० /- रु असा एकूण ७५७०० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींताविरुद्ध पोलीस ठाणे रामटेक येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना जन्त मुद्देमालासह पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे रामटेक करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार रोशन काळे, शंकर मडावी नितेश पिपरोडे.. विपीन गायधने, उमेश फुलबेल यांनी पार पाडली.