PMC घोटाळ्याच्या आरोपीशी आर्थिक संबंध; किरीट, नील सोमय्यांना अटक करा: संजय राऊत

मुंबई :  आजच्या बहुप्रतिक्षित पत्रकार परिषदेत संजय राऊत  यांनी आजपर्यंतच्या सर्व आरोपांना सव्याज प्रत्युत्तर दिलं. पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवानशी सोमय्यांचा काय संबंध? सोमय्यांनी त्यांच्याकडून जमीन घेतली कशी? त्यांच्या मुलाची आणि वाधवानची बिझनेस सेटलमेंट काय? असे एक ना अनेक सवाल राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले, “निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्या यांची आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आहे. त्यांचा मुलगा नील किरीट सोमय्या यांची आहे, जो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी मौजे गोखीवरे ता. वसई येथे उभारला आहे. हे मी पुराव्यानिशी सांगतोय.”

“पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल केलं. वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन फ्रंटमॅन आहे लाढानी म्हणून त्याच्या नावावर घेतली तसंच कॅशही घेतली. ती ८० ते १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. गोखीवरे वसई येथे ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त साडे चार कोटी रुपयांना घेतली. आणखी एक जमीन घेतली आहे, ती सात कोटी रुपयांची आहे आणि त्याच जमीनीवर कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या निकॉन फेज १, निकॉन फेज २ उभारले जातायत.”

या प्रकल्पात पर्यावरण मंजुरी नाही. अनेक नियमांची पायमल्ली केली गेली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने जर दखल घेतली तर २०० कोटी रुपयांचा दंड होईल. माझं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे, की ताबडतोब यात लक्ष घाला. या प्रोजेक्टचे सर्व परवाने रद्द करा..

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी OW ने किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला अटक करावी. पीएमसी बँक घोटाळ्याआधी किरीट सोमय्याच्या जवळच्या लोकांनी बँकेतील सगळे पैसे काढून घेतले आहेत. म्हणजे त्यांना घोटाळा होणार आहे, हे माहिती होतं. ही सगळी यादी मी तुम्हाला देणार आहे. मुळात पीएमसी बँक घोटाळ्यातील माणसाने किरीट सोमय्या यांना जमीन कशी विकली?, असा सवाल राऊतांनी विचारले.

“दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसीचा तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीला पाठवले.. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता.. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो.. ईडी भ्रष्ट आहे, हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावाय”, असंही राऊत म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

किरीट सोमैया की पहली प्रतिक्रिया

Tue Feb 15 , 2022
इसी तरह 2017 में हुए मैच से बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंपनी में मेरी वाइफ प्रा. मेधा ने सोमैया को बदनाम करने की कोशिश की थी। अब मेरे बेटे का नाम लिया गया है। ठाकरे सरकार ने अब तक मेरे खिलाफ 10 मामले दर्ज किए हैं और तीन और विचाराधीन हैं। मैं उनकी स्थिति को समझता हूं। मैं एक और मामले का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com