‘प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी योजने’चे फसवे संकेतस्थळ व भ्रमणध्वनीपासून सावधान

नागपूर – प्रधानमंत्री कुसूम योजने अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरीलाभार्थ्यांनी फसवे संकेतस्थळभ्रमणध्वनीपासून सावध असावेअसे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापकांनी केले आहे.

महाऊर्जा विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वर्धा व इतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सायबर सेलमध्ये तक्रारी केल्याच्या दिसून येत आहे. काही बनावट संकेतस्थळमोबाइल ॲप तसेच दुरध्वनीभ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची  किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे. अशा खोटयाफसव्या संकेतस्थळासह मोबाइल ॲपला भेट देऊ नये तसेच फसव्या दूरध्वनीभ्रमणध्वनीच्या संभाषणालाआवाहनाला बळी पडू नये व अशा फसव्या संकेतस्थळावरॲपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करू नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री कुसूम योजना राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबवण्यात येत आहे. महाऊर्जाच्या या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाइन नोंदणीसाठी महाऊर्जा कार्यालयाच्या अधिकृत https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojna-Component-B व www.mahaurja.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, जी.पी.ओ. चौक, सिव्ह‍िल लाईन, नागपूर दूरध्वनी क्रमांक 0712-2531602, 0712-2564256 किंवा ई-मेल आयडी domedanagpur@mahaurja.com वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कार्यालय, नागपूरद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

 दारू भट्टीवर छापे ; एकुण 9,50,000 रूपयाचा मुद्देमाल जप्त..

Tue Jun 14 , 2022
कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची धडक कारवाई नागपूर / कळमेश्वर  – कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथील पारधी बरड येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तीची मोठ्याा प्रमाणावर आजुबाजुचे परीसरात विक्री होत असल्याची गोपनिय खबर कळमेष्वर पोलिसांना मिळाल्याने  पोलिस अधिक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर,  उपविभागीय पोलिस अधिकारी  अजय चांदखेडे यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!