नागपूर :- श्रावण पौर्णिमा व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त इसासनी भीमनगर येथील बोधीमग्गो महाविहाराच्या भंते बोधिविनीत परिसरात नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी बंजर असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले.
हे वृक्षारोपण महाविहाराचे व्यवस्थापक भंते डॉ शीलवन्स, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य भन्ते नागदीपंकर व विभाग प्रमुख डॉ नीरज बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी प्रा डॉ तुळसा डोंगरे, डॉ सुजित बोधी, डॉ बिना नगरारे, रंजना वनकर ढोरे, उत्तम शेवडे, शुभांगी देव, सुभाष बोंदाडे, प्रिया खोब्रागडे, भारती खरे, विजय वासनिक, विजय जांगडेकर, भीमराव मेश्राम, सुरेंद्र पझारे, किशोर ढोक, चंद्रकांत रामटेके, अधीर बागडे, अभिलेश वाहाने, सचिन देव, योगिता इंगळे, आशा वासनिक, प्रकाश सोमकुवर, प्रीती रामटेके, प्रेमलता भोयर, सरोज लामसोगे, आशा कुमारी, श्याम फाळके, करूना कराडे, ज्योती खोब्रागडे, रत्नमाला गजभिये, गौतम पाटील, संबोधी डोंगरे, शामराव तिरपुडे, भानुदास ढोरे यांच्यासहित मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.