संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-7 मार्च ला कामठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
कामठी :- केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर उडानपूल बांधकामासाठी 65 कोटी 29 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून उडानपूल बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण करून देण्याच्या निर्देशित सात वर्षांची मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांच्या मनमणीपणामुळे काम पूर्णत्वास आले नसून उलट कामात संथपणा सुरू आहे.तर दुसरीकडे आजनी रेल्वे फाटक बंद करून भुयार पुलिया चे काम सुरू असले तरी जडवाहतुक बंद असल्याने या मार्गाहून जाणाऱ्या जड वाहतुकदारासह शालेय बस वाहतूक,शेतकऱ्यांना शेती माल वाहुन नेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असून मानसिक त्रास भोगावा लागत आहे.रमानगर रेल्वे ओव्हरब्रिज तसेच आजनी भुयार पुलिया वरून वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारात मोठ्या प्रमाणात आक्रोश घसरला आहे तर या विधानसभा क्षेत्राला योगायोगाने दोन दोन आमदार लाभूनही मागील सात वर्षापासून रमानगर रेल्वे ओव्हरब्रिजचे काम पूर्णत्वास आले नाही इतकेच नव्हे तर आजनी भुयार पुलियाचे काम सुद्धा पूर्णत्वास न आल्याने रमानगर उडानपूल तसेच आजनी भुयार रस्ता बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या मागनीसाठी येत्या 7 मार्च ला सकाळी 11 वाजता माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी विधानसभा कंग्रेस पक्ष द्वारा ‘भव्य जण आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.अशी माहिती माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.याप्रसंगी जी प सदस्य दिनेश ढोले,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे , कंग्रेस चे माजी कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव,कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे,उपसभापती कुणाल इटकेलवार,कांग्रेस पदाधिकारी इर्शाद शेख, राशीद अन्सारी, कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,माजी नगरसेवक नीरज लोणारे,माजी सरपंच प्रवीण कुत्थे ,धीरज यादव, प्रमोद गेडाम,नरेंद्र शर्मा,राजकुमार गेडाम,प्रमोद खोब्रागडे, आशिष मेश्राम आदी उपस्थित होते.
कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या रमानगर उडानपूल बांधकाम सण 2020 पर्यंत करून देणे हे नियोजित होते मात्र दरम्यान आलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे काम थंडबसत्यात असल्याने पुनश्च या कामाला 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ संपूनही बांधकाम पूर्णत्वास येईना अशी अवस्था आहे,।बांधकामाच्या नावाखाली रमानगर रेल्वे फाटक मार्ग बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद असते तसेच आजनी भुयार पुलिया बांधकाम प्रगतीपथावर असल्याने या दोन्ही मार्गाने जड वाहने तसेच शालेय ,महाविद्यलयीन बस वाहतुकीला आळा बसला आहे.ज्यामुळे वाहतुकदारासह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे.नाइलाजास्तव या दोन्ही मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या शालेय महाविद्यालयीन बस वाहतूकदार तसेच इतर जड वाहतूकदारांना पावंनगाव मार्गे प्रवास करावा लागतो बरेचदा या मार्गावर विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते.
7 मार्च ला कामठी तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या जनाक्रोश मोर्चात मागील सात वर्षांपासून रमानगर रेल्वे उडानपुल बांधकाम संत गतीने सुरू असल्याने या मार्गाहून मार्गक्रमण करणाऱ्या शालेय विद्यार्थी तसेच शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकाना नाहक वेठीस धरले जाते।याला जवाबदार असलेल्या कंत्राटदाराविरुध्द प्रशासकीय दखल घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा,अर्धवट रखडलेल्या आजनी पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आणूंन लवकरात लवकर पूलिया सुरू करणे तसेच ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने बराच वेळ पर्यंत वाहतूक ठप्प राहते दरम्यान नागरिकात आपापसात वाद होतात तर विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर होतो यासाठी या मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे,मेट्रो रेल्वे तसेच रेल्वे ची तिसरी लाईन पुलिया चे कार्य रखडले असल्याने या मार्गाहून वाहतुक करणाऱ्या आजनी, गुमथळा,घोरपड, कापसी, पावनगाव यासह तालुक्यातील समस्त ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकाना असुविधा होत असल्याने बाह्य वळण मार्ग कन्हान तसेच पावनगाव मार्गे प्रवास करावा लागतो या प्रकाराला कंटाळून नागरिकांत मोठा आक्रोश निर्माण झाला आहे तेव्हा या सर्व समस्या तडकाफडकी मार्गी लावून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या या मागण्याचा समावेश आहे.तसेच या जनाक्रोश मोर्च्यांत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले.