रोहयो अंतर्गत बांबू लागवड कार्यक्रमासाठी आराखडा तयार करावा – रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे

मुंबई :- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वसमावेशक वस्तुनिष्ठ आराखडा तयार करावा अशा सूचना रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीविषयी आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, वन विभागाच्या सुनिता सिंग, फलोत्पादनचे संचालक डॉ. केलास मोते, बांबू तज्ज्ञ व दापोली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अजय राणे आदी उपस्थित होते.

बांबू लागवड करण्यासाठी हेक्टरी 6 लाख 97 हजार रुपये अनुदान मनरेगा अंतर्गत देण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री. भुमरे म्हणाले, कृषी विभाग, वन विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग यांनी संयुक्तपणे बांबू लागवडीसाठी द्यावयाच्या अनुदानाचा सविस्तर आराखडा तयार करावा. त्यामध्ये मजुरांचे आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे. वैयक्तीक लाभाची योजना राबवताना ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर राबवली जावी, अशा सूचना मंत्री भूमरे यांनी दिल्या.

बांबू लागवडीसाठी जमीन तयार करणे, कुंपन घालणे यासाठी पुरेशी तरतूद अंदाज पत्रकात करावी. प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित असावी. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्याने एकत्रित काम करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळेला भेट

Wed Jan 17 , 2024
– विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक पुणे :- राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आणि संवाद कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. शालेय अभ्यासक्रमासोबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढण्यास मदत होते, असे राज्यपाल म्हणाले. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, उपविभागीय अधिकारी स्नेहा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com