मेट्रो प्रवास दरम्यान प्रवाश्यांशी डॉ. दीक्षित यांचा साधला संवाद
नागपूर : जुने प्रवासी संख्येचे सर्व आकडे मोडून काढत महा मेट्रोने दोन दिवसांपूर्वी ६६,४२८ चा विक्रमी प्रवासी आकडा गाठला आहे. सातत्याने नागपूरकरांच्या मेट्रो प्रति विश्वास वाढत आहे. आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी ऍक्वा आणि ऑरेंज मार्गिकेवर मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो ट्रेनने प्रवास करत स्टेशन परिसरातील सोई-सुविधांची पाहणी केली. यासोबतच त्यांनी मेट्रो प्रवाशांशी संवाद साधत त्यांचे मेट्रो प्रवासा संबंधी अनुभव जाणून घेतले.
आपल्या प्रवास डॉ. दीक्षित यांनी मेट्रो स्टेशन वर उपलब्ध सूचना पेटींचे निरीक्षण केले आणि त्या संबंधी कर्मचरायन्ना विचारपूस केली. प्रवाशांच्या गरज लक्षात घेत कार्य करण्याचे निर्देश दिलेत. या व्यतिरिक्त डॉ. दीक्षित यांनी स्टेशन परिसरात ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध घटकांकरता उपलब्ध असलेले व्हील चेयर, बेबी केयर रुम अश्या तत्सम बाबींचा आढावा घेतला. प्रवासी उद्घोषणा प्रणाली प्रात्यक्षिक करून घेत ते योग्य स्थितीत असल्याची खात्री करून घेतली.
डॉ दीक्षित यांनी या दरम्यान मिहान येथील मेट्रो डेपोची देखील पाहणी करत तेथे उपलब्ध असलेल्या विविध संयंत्रांची पाहणी केली. मेट्रो मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांशी बोलत त्यांचे अनुभव जाणून घेतले. डॉ दीक्षित यांनी या पाहणी दरम्यान सांगितले कि, प्रवाश्यांच्या गरजेनुसार त्या सर्व बाबींची नित्य-नेमाने अंमलबजावणी करावी. तसेच प्रवाश्यांच्या कुठली अडचण असले त्या बद्दल त्यांचे समाधान करावे असे देखील ते म्हणाले.
यावेळी महा मेट्रोचे संचालक(रोलिंग स्टॉक अँड सिस्टम) सुनील माथूर, संचालक( स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे , कार्यकारी संचालक राजेश पाटील,नरेश गुरबानी,उदय बोरवणकर,जय प्रकाश डेहरिया, गिरधारी पौनीकर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक आशिष संघी, हिमांशु घटवारी,महाव्यस्थापक सुधाकर उराडे आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.