नागपूर :- ज्या प्रमाणे फुलन देवी अन्याय अत्याचाराविरोधाची प्रतिक ठरली आणि सावित्रीबाई फुले शैक्षणिक चळवळीची प्रेरणा देऊन गेली या दोघांना महिलांना अंगिकार केला तर नक्की कुठे तरी अत्याचाराव अंकुश बसेल असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते फुलन देवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंविमोच्या यशवंत स्टेडियम येथिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागनदेवी मेश्राम, प्रमुख पाहुणे संजीवनी कुमरे, सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपूरी, ओबीसी नेते राजू पांजरे, मांतग समाजाचे नेते मनोहर इंगोले, आंविमो विदर्भ प्रदेश संघटक प्रकाश कांबळे, महिला नेत्या वंदना शेवतकर, रेखा वाघमारे, हे होते, कार्यक्रमाचे सूत्र संचालन धर्मा बौद्ध बागडे यांनी केले तर आभार हंसराज उरकुडे यांनी मानले. यशस्वीरित्या दादाराव पाटील, रोहन बागडे, आकीब अंसारी, श्रीकांत भावे, शालिक बांगर, ज्ञानेश्वर ढेंगरे हे उपस्थित होते. याप्रसंगी मणिपूर येथिल महिला अत्याचारांच्या घटनाचे निषेध व्यक्त करण्यात आला.