– पश्चिम क्षेत्रिय खो-खो स्पर्धेत होणार सहभागी
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खो-खो महिला संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉक्टर विशाखा जोशी यांनी केली आहे. बाॅंसवाडा येथील गोविंद गुरु आदिवासी विद्यापीठ येथे १६ ते १९ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजित पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे.
खो-खो महिला संघामध्ये अरविंद बाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी येथील दिव्या सावरकर, रोशनी उमाठे, नबीरा महाविद्यालय काटोल येथील युक्ती वैद्य, नेहा पेठे, यशोदा उमाठे, चेतना सावरकर, समीक्षा गजबे, महिला महाविद्यालय नागपूर येथील रोहिणी दार्रो, नीलिमा पुडो, रेश्मा घावडे, मोनिका करणगामी, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील मोनिका कुलुरकर, मंजुली बेपी, यशवंत महाविद्यालय सेलू येथील दिशा ठाकरे, ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील आरती पांडे यांचा तर राखीव खेळाडूंमध्ये यशवंत महाविद्यालय सेलू येथील आश्लेषा झोलेकर, नबीरा महाविद्यालय काटोल येथील मानसी सातफळे, श्री निकेतन कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील गंगा पांचेश्वर, सेवादल महिला महाविद्यालय नागपूर येथील मेघा इंगळे, बॅरि. एस. के. वानखेडे महाविद्यालय मोहपा येथील तेजस्विनी भाकले, महिला महाविद्यालय नागपूर येथील वैष्णवी कुमरे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या संघाला माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ. विशाखा जोशी व मंडळाच्या सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.