संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-भव्य कामगार जनशक्ति परिषद यशस्वी
कामठी :- ओरिसा सरकारने आपल्या राज्यातील समस्त कंत्राटी कामगारांना स्थायी केले तेव्हा ओरिसा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील संपूर्ण कंत्राटी कामगारांना स्थायी करा या मागणीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून गरज पडल्यास आंदोलनाचा सुद्धा पवित्रा घेणार असल्याचे मौलिक मत राष्ट्रीय मजदूर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे यांनी कामठी स्थित मुस्लिम समाज भवन सभागृहात राष्ट्रीय मजदूर सेना नागपूर जिल्हाद्वारे कारखाने बचाव -कामगार बचाव विषयावर आयोजित भव्य कामगार जनशक्ती परिषद कार्यक्रमात बोलत अध्यक्षस्थानी बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक सुप्रसिद्ध बहुजन आंबेडकरवादी साहित्यिक डॉ धनराज दहाट, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिरिपा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे, प्रो युगुल रायलू, मौलाना मो शोएब, बाळूमाता कोसंमकर, नरेंद्र डोंगरे,(पिरिपा नागपूर जिल्हाध्यक्ष), कैलास बोंबले (पिरिपा नागपूर शहर अध्यक्ष),प्रो दुर्योधन मेश्राम,विद्या भीमटे, अरुण दामोदर, प्रमोद भागचंदाणी, अनावरुल हक पटेल, कामगार नेता विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
जनशक्ती परिषद यशस्वीरीत्या पार पडली असून उपस्थित मान्यवरांनी आपले मौलिक मार्गदर्शन करून मजुरांचे मनोबल मजबूत करीत मजदूरांच्या सदैव खंबीरपणे उभे राहणार असल्याचे ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामगार नेता विजय पाटील, कैलास बोंबले, सूयोग रायपुरे, अरविंद वैद्य, विठ्ठल ठाकरे, प्रदीप कोल्हे, रामकृपाल यादव, सुदेश ढोणे,गोपाल बडगे,देविदास सव्वालाखे,पांडुरंग मुंडे,संजय खोब्रागडे, मंगेश ढाबरे आदींनी मोलाची भूमिका साकारली.